आता `ईमेल`वर पाठवा खरंखुरं `किस`!

जर का तुमची प्रिय व्यक्ती दूर असेल, तर आता तुम्ही सहजच त्या आवडत्या व्यक्तीला `किस` म्हणजेच चुंबन पाठवू शकाल. बरबेरी आणि गुगल यांनी मिळून `किस` इमेल करण्याची एक आगळीवेगळी सुविधाच सुरु केलीय.

Updated: Mar 13, 2014, 05:25 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जर का तुमची प्रिय व्यक्ती दूर असेल, तर आता तुम्ही सहजच त्या आवडत्या व्यक्तीला `किस` म्हणजेच चुंबन पाठवू शकाल. बरबेरी आणि गुगल यांनी मिळून `किस` इमेल करण्याची एक आगळीवेगळी सुविधाच सुरु केलीय.
या सुविधेचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही `किस.बरबेरी.कॉम` (Kisses.Burberry.com) यासंकेतस्थळावर लॉग इन करा. एकदा तुमचं रजिस्टर झाले की, `किस`चा इमेल आवडत्या व्यक्तीला करु शकता.
तुम्हाला ब्लॅकबेरीमधून वेगवेगळ्या रंगाचे `किस` तसंच त्यामध्ये एखादा वैयक्तिक मॅसेजही पाठवता येईल. अॅनिमेशननं तुमचा `किस` आवडत्या व्यक्तीकडे जाताना पाहता येईल.
तुम्हाला डेस्कटॉप, मोबाईल किंवा लॅपटॉपच्या कॅमेऱ्यामधून फोटो काढून आवडत्या व्यक्तींला पाठवा. मात्र कॅमेरा आणि मोबाईलमधून `किस` पाठवताना अडचण येत असेल. तर बरबेरीचे `क्लिक किसेस` पर्याय निवडून तुम्हांला `किस` पाठवता येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.