फेसबुक प्रोफाईलवरून कळू शकणार मानसिक आजार

आता फेसबुक प्रोफाईलवर तुमच्या मानसिक आजाराचा पर्दाफाशदेखील होऊ शकतो. तुम्हांला काय मानसिक आजार आहे यासाठी आता तुम्हांला एखाद्या मानोसोपचार तज्ज्ञाकडे जावचं लागेल असं अजिबात नाही..

Updated: Jan 27, 2013, 03:47 PM IST

www.24taas.com, वॉश्गिंटन
आता फेसबुक प्रोफाईलवर तुमच्या मानसिक आजाराचा पर्दाफाशदेखील होऊ शकतो. तुम्हांला काय मानसिक आजार आहे यासाठी आता तुम्हांला एखाद्या मानोसोपचार तज्ज्ञाकडे जावचं लागेल असं अजिबात नाही. हे एका संशोधनातून समोर आले आहे.
मिसोरी विश्वविद्यालयातील संशोधकांच्य मते, सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसोपचाराचे निदान केले जाऊ शकते. एखाद्या उपकरणासारखा सोशल नेटवर्किंग साईटचा रूग्णाला फायदा करून घेता येईल, आणि त्यामुळे रूग्ण स्वत:च्या समस्या दूर करू शकतो. या संशोधनावर अभ्यास करणाऱ्या एलिझाबेथने सांगितले की, `उदाहरणचं द्यायचं झालं तर... व्यक्तीला एखादी प्रश्नावलीद्वारे त्या व्यक्तीच्या स्मृतीबाबत समजू शकते, त्यामुळे ती माहिती योग्य आहे की नाही, हे सुद्धा समजते. रूग्णाला फेसबुकवर त्याने शेअर केलेल्या गोष्टीबाबत प्रश्न विचारण्यात येतील. आणि तेव्हाच आम्हीही पाहू की, समोरची व्यक्ती नैसर्गिकरित्या ही उत्तरे देते का, किंवा उत्तरे देण्यासाठी तेवढी सक्षम आहे का.`
मात्र फेसबुक युझर्सना त्यांची मानसिक स्थिती काय आहे, हे जर जाहीर करायचे नसल्यास ती माहिती दडवूनही ठेवता येणं शक्य आहे. सोशल मीडियावरील तुमच्या प्रोफाईलवरील ह्या उपकरणाचा मानसोपचार आणि चिकित्सक स्वरूपात वापर करता येणार आहे. ही माहिती मानसोपचार विभागातर्फे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून देण्यात येणार आहे. मार्टिनच्या मते, रूग्णाच्या सोशल मीडियाचा वापर कसा केला जातोय यावरून त्या रूग्णाबाबत अंदाज लावता येणार आहे.