www.24taas.com,मुंबई
अजमल कसाब याल पुण्यात फाशी देण्यात आल्यानंतर सोशल नेटवर्किंला चालना मिळाली. मंदावलेल्या गतीने वेग घेतला आणि कसाबच्या फाशीचे स्वागत केले. कोणी फोटो टाकलेत. तर कोणी शहीदांना हीच खरी श्रद्धांजली असल्याचे पोस्ट केले. मात्र, या घडामोडीत मजेशीरबाबही पुढे आली ती म्हणजे नेटीझन्सना पडलेले प्रश्न.
पुण्यात येरवडा तुरूंगात कसाबला ७.३० वाजता फाशी दिल्याचे वृत्त मीडियाने ब्रेक करताच दुसऱ्याच मिनिटात फेसबुकची वॉल कमेंट्सने भरू लागली. कसाब फाशीचे स्वागत करताना काहींनी आठवणींही शेर केल्यात. काहींनी आपल्या भावनांना वाट करून दिली. तर काहींनी फाशीबाबत शंका उपस्थित केली.
यात काहींनी असं म्हटलं, वाढत्या महागाईमुळे सरकारला कसाबचा कोट्यवधींचा खर्च परवडत नव्हता म्हणून त्याला फाशी देण्याचे ठरविले.
तर काहींनी त्याला डेंग्यु झाला होता. त्यानेच त्याचा मृत्यू झाल्याने सरकारने आपली अब्रु वाचविण्यासाठी गुप्तपणे फाशी दिल्याचा बनाव केलाय. कसाबचा हिसाब डेंग्युनेत केलाय.
फाशी देण्याआधी कसाब जिवंत होता का?, मुंबईहून पुण्याला नेताना तो स्वत:च्या पायावर उभा होता का, याचे साक्षीदार कोण?
फासावर जाताना तो चालत गेला का? की कसाबला खरंच फासावर चढवला की डेंग्युने मेला?
सकाळी कसाब जेव्हा उठला तेव्हा जेलर त्याला म्हणाल, चलो लेट्स हॅंग आऊट.
अमेरिका आणि भारत दोन्ही ग्रेट राष्ट्रे आहेत. अमेरिकेने ऑपरेशन ओसामा गुप्त ठेवले तर भारताने कसाब मिशन एक्स गुप्त ठेवले.
कसाब फाशीवर प्रश्न पोस्ट करताना काहींनी विनोद बुद्धी वापरली. काहींतर मच्छरचे आभार मानले. जे सरकार करू शकले नाही ते मच्छरने करून दाखविले. त्यामुळे मच्छर या कीटकाला राष्ट्रीय दर्जा देण्याची मागणी केली.