www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
जर तुम्हाला एकाच क्लिकमध्ये तीन तासांचा सिनेमा डाउनलोड करता आला तर नक्कीच तुम्ही खूश व्हाल! सिनेमाप्रेमींसाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आणि आता हेच स्वप्न सत्यात उतरणार आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सनं सांगितलं की, त्यांनी एक तंत्र विकसित केलंय. जे ५जी वर आधारीत असेल. कंपनीने असंही सांगितल की, ही युक्ती ४जी ची जागा घेईल. `५ जी`च्या साहाय्याने आपण एका सेकंदात तीन तासांचा सिनेमा आरामात डाऊनलोड करु शकतो.
हे तंत्रज्ञान दोन किमीच्या अंतरावर एक जीबी प्रति सेकंदाच्या अंतरानं डेटा पाठविण्यास सक्षम आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.