www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
कोरियन कंपनी एलजीने आपला नवा स्मार्टफोन एलजी जी-२वर आधारित बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनकडून कंपनीला मोठी अपेक्षा आहे.
२०१४ पर्यंत २०० कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल कंपनीला अपेक्षित आहे. कंपनीने ४-जीवर काम करणाऱ्याचे तंत्रज्ञान या फोनमध्ये वापरले आहे. एलजीने सोमवारी हा नवा फोन बाजारात दाखल केला.
या फोनची किंमत ४१,५०० रूपये आहे. एलजी इंडिया कंपनीचे प्रबंधकन निदेशक सून वॉन यांनी सांगितले, २०१४च्या वर्षांपर्यंत १० टक्के भागिदारी या कंपनीचा असेल. जी -२पासून १५०- २०० कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल होईल, याची खात्री आहे.
कंपनीने ४-जी तंत्रज्ञान या मोबाईलमध्ये उपलब्ध करून दिले आहे. या तंत्रज्ञानावर दोन मॉडेल बाजारात आणले आहे. यामध्ये एलजी जी-२ मध्ये ३२ जीबी क्षमतेचा फोन असणार आहे. याची किंमत भारतात अधिक असेल.
कंपनीचा हा फोन सुरूवातीला ३ जी वर काम करील. मात्र, ४-जी तंत्रज्ञान आल्यानंतर तसा फोन बनविण्यात येईल. हा फोन ४-जीवर काम करेल. दरम्यान, भारतात रिलायन्स इन्फोकाम, भारती एअरटेल, एअरसेल तसेच अन्य कंपनींकडे ४-जी सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रायोगित तत्वावर ही सेवा या फोनद्वारे देण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे.