गुगल करणार तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड डिलीट

इंटरनेटवर आपलं अकाऊंट हॅक होणं आणि त्यामुळे तुमच्या अनेक महत्त्वाच्या माहितीचा चुकीचा उपयोग होतो. या गोष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

Updated: Jan 23, 2013, 04:46 PM IST

www.24taas.com, लंडन
इंटरनेटवर आपलं अकाऊंट हॅक होणं आणि त्यामुळे तुमच्या अनेक महत्त्वाच्या माहितीचा चुकीचा उपयोग होतो. या गोष्टीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.. आणि त्यामुळेच आता तुमचा पासवर्डच डिलीट करून टाकण्याचा गुगलने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमचं अकांऊट चालू करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा पासवर्ड म्हणून वापर करावा लागणार आहे.
यूएसबी ड्राईव्ह, चावी, अंगठी किंवा चेन यासारख्या गोष्टी तुमच्या अकांऊटचा पासवर्ड म्हणून वापराव्या लागणार आहे. कारण गुगलने पासवर्ड डिलीट करण्याचं ठरवलं आहे. गुगलने आता पार्सवर्डऐवजी `फिजीकल की`चा वापर करायचं ठरवलं आहे. त्यामुळे गुगलने पासवर्ड डिलीट केल्याने `फरगॉट पासवर्ड?` असा एफएक्यू तुमच्या कम्प्युटरवर दिसणारच नाही. इंटरनेट युझर्सनी त्यांच्याकडे असणारा यूएसबी, चावी किंवा अंगठी कम्प्युटरमध्ये लावायचा, त्यामुळे त्याचं लॉगइन होईल आणि यासाठी पासवर्डची गरज भासणार नाही.
त्यावर एक मायक्रोचीप टाकली जाईल, त्यामध्ये तुमची सर्व बायोमेट्रिक माहिती असेल आणि तोच तुमचा `पासवर्ड` असेल. त्यामुळे युझर्सना लॉगइन करण्यासाठी पासवर्ड गरजेचा नाही. या नव्या यंत्रणेसाठी स्मार्टफोन किंवा स्मार्टकार्डही उपयुक्त ठरणार आहे. तसंच मोबाइल फोनच्या माध्यमातूनही लॉगइन करता येणार आहे.