www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे... काही तरुण सोडता आता रोज आपला मेल चेक करणं, स्मार्टफोनचा वापर आणि दुसऱ्या रेग्युलक टेक्निकल प्रॉडक्ट्सला अपडेट करणं याला एक कटकट मानतात. जर तुम्ही सुद्धा असाच विचार करत असाल तर जरा या ४५ वर्षीय क्रिश डॅन्सीला पाहा...वाचून तुम्हाला धक्का बसेल... क्रिश हे दररोज जवळपास ३०० टेक्निकल प्रॉडक्ट्स आणि गॅझेट्सचा वापर करतात.
आपल्या दिनचर्येतील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी क्रिश या गॅझेट्सचा वापर करतात. त्यांच्या डोळ्यांवर गूगल ग्लास लावतात. त्याच्या मनगटावर फिटबिट आणि पॅबल सारखे रिस्ट ब्रँड ट्रॅकर आणि फिटनेस गॅझेट असतात. तो स्वत:ला वायफाय सोबत कनेक्ट ठेवतो आणि आपल्या शरीरातील प्रत्येक मिनिटाची माहिती डाटाच्या रुपात फीड करतात. एवढंच नव्हे तर तो घरी झोपण्यासाठी सुद्धा बेडिट मॅट्रेस कव्हरचा वापर करतात ज्यामुळं त्यांच्या झोपेची आणि वेळेची माहिती ट्रॅक केली जाते.
क्रिश डॅन्सी बीएमसीचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. त्यांना जगातील सर्वाधिक `क्वांटिफाईड व्यक्ती` संबोधलं जातं. त्यांच्या पूर्ण शरीरावर सेंसर लावलेले आहेत. डॅन्सी तर डॅन्सी त्यांचा कुत्रा सुद्धा टॅगद्वारे ट्रॅक केला जातो आणि त्याच्या प्रत्येक हालचालीचं लॉगबुक तयार असतं.
पाच वर्षांपूर्वी क्रिश असे नव्हते, ते खूप आजारी असायचे आणि स्वत:च्या आरोग्याची नेहमी तपासणी सुद्धा करवून घेत होते. क्रिश सांगतात, "मी हे सगळं ५ वर्षांपूर्वी सुरू केलं. कारण एकदा माझ्या डॉक्टरच्या हातून माझे काही रिपोर्ट हरवले. म्हणून मी हा निर्णय घेतला आणि स्वत:चे रिपोर्ट्स स्वत:जवळ ठेवला आणि त्यासाठी मला खूप गॅझेट्सची गरज होती. यानुसार हे सगळं सुरू झालं. मॅशेलबल वेबलाईटमध्ये छापलेल्या या बातमीनुसार, डॅन्सी आपला हेल्थ रेकॉर्ड ठेवू इच्छित होता पण डेटा लिहिण्याचा त्याला कंटाळा होता. शिवाय तो टेकसेवी असल्यामुळं टेक्नॉलॉजीला कनेक्ट करून तो यात उतरला.
त्यानं गेल्या ५ वर्षात आपलं ४५ किलो वजन कमी केलं. बॉडी मीडिया फिटनेस ट्रॅकर आणि पॅबल मला सर्वात जास्त आवडतं, असं क्रिश सांगतात. तर कधी कधी टेक्नॉलॉजीपासून दूर राहण्यासाठी क्रिश साप्ताहिक सुट्टीही घेतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.