www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मारुती ऑल्टो या गाडीच्या 25 लाख युनिटची विक्री नोंदवण्यात आलीय. मारुती या कार कंपनीसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विक्रीचा हा आकडा गाठून मारुतीनं कार कंपन्यांच्या इतिहासच नोंदवलाय, असं म्हणायला हरकत नाही.
विक्रीत 25 लाखांचा आकडा गाठणारी मारुती ऑल्टो ही कंपनीची पहिलीच गाडी ठरलीय. मारुती 800 चं प्रोडक्शन बंद झाल्यानंतर मारुती ऑल्टोनं 25 ते 30 हजार युनिटस् प्रत्येक महिन्याला विकले जात आहेत. मारुती ऑल्टोनं हा आकडा 14 वर्षांपेक्षा कमी काळात गाठलाय.
कंपनीनं मारुती ऑल्टो ही गाडी 2000 साली लॉन्च केली होती. भारतातील सर्वात मोठी कार बनविणारी ही कंपनी एक्सपोर्टच्या बाबतीतही सर्वात पुढे आहे. ऑल्टोनं 10 ऑगस्ट 2010 मध्ये लॉन्च झाली होती आणि ऑल्टो 800 ऑक्टोबर 2012मध्ये सादर झाली होती.
ऑल्टोमध्ये 800 सीसीचं लोकप्रिय इंजिन वापरण्यात आलंय. 2001 पासून जवळजवळ चार वर्षांपर्यंत कंपनीनं ऑल्टोमध्ये 1.1 लीटरचं इंजिन लावलं परंतु नंतर ते काढण्यात आलं. 2010 मध्ये एक लीटर 3 सिलिंडरच्या सीरिज इंजिन आणि केबल शिफ्ट गिअर बॉक्स लावण्यात आला. हीच पद्धत ‘वॅगन आर’मध्येही वापरली गेली.
ऑल्टो 800 ची किंमत 2.72 लाखांपासून सुरू होते तर के-10 ची किंमत 3.15 लाख रुपयांपासून सुरु होते. या किंमती दिल्लीतल्या एक्स शोरुममध्ये पाहायला मिळतात. गाडीमध्ये तुम्हाला पीएनजी आणि सीएनजी असा ऑप्शनही मिळतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.