<b><font color=red>मुंबई पालिकेत आरोग्य विभागात भरती </font></b>

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 13, 2013, 11:08 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
सहाय्यक परिचारिका प्रसविका गट - क (फक्त महिलांकरिता) एकून ५६ पदे भरण्यात येणार आहेत. तर अपंगांकरिता असलेल्या आरक्षण धोरणानुसार एकूण ७२१ पदांवर २२ पदे आरक्षित आहेत. अंध,क्षीणदृष्टी - ८, चलनवलनविषयक विकलांगता - ३, श्रवणशक्तीतील दोष -७, अशी १८ पदे भरण्यात येणार आहेत.
उमेदवारांनी भरतीसाठी प्रशिक्षण सभागृह, रूम नं. ७, कस्तुरबा रूग्णालय, साने गुरूजी मार्ग, आर्थर रोड जेलजवळ, चिंचपोकळी (प.) मुंबई -११ येथे दि. ७ आणि ८ जानेवारी २०१४ रोजी सकाळी १०.३० ते ४ वाजेपर्यंत उपस्थित राहावे.
अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.