www.24taas.com, झी मीडिया, जालंधर
रेल्वेनं प्रवास करतांना आपलं स्टेशन सुटून जाण्याच्या भीतीनं अनेक जण झोपतच नाही. मात्र आता स्टेशन सुटण्याचं टेंशन सोडून द्या... आता आपल्याला स्टेशन यायच्या आधी त्याची माहिती मिळून जाईल.
आता एक असं मोबाईल अॅप आलंय की जो स्टेशन यायच्या १०-१५ किलोमीटर आधीच आपल्याला त्याबाबत सांगेल. या अॅपमध्ये देशातल्या विविध रेल्वेगाड्यांची माहिती आणि टाईमटेबल फीड करण्यात आलीय. हे अॅप जीपीएस सिस्टिम सारखं काम करेल.
अँड्रॉईड मोबाईलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून त्याचा उपयोग करू शकतो. जर रेल्वे उशीरानं धावत असेल तर त्याचीही माहिती या अॅपद्वारे मिळेल.
कसा डाऊनलोड कराल अॅप
आपल्या अँड्रॉईड फोनच्या प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर Rail Alarm किंवा कोलंबस अगेन टाईप करा. अॅप आल्यानंतर ते डाऊनलोड करा. यानंतर ज्या दिवशी तुम्ही रेल्वेनं लांबचा प्रवास करत असाल तेव्हा अॅप अॅक्टिव्हेट करा आणि पुढं दिलेल्या माहितीनुसार अलार्म सेट करा.
या अॅपद्वारे आणखीही महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे. कोणती रेल्वे किती वेळात स्टेशनवर येईल. शिवाय आपण घरी बसूनच रेल्वेची पोझिशनचीही माहिती घेऊ शकतो. पुढचं स्टेशन कोणतं येणार आहे, याबाबतही हे अॅप माहिती देतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.