आता दोन मिनिटांत करा संपूर्ण सिनेमा डाऊनलोड!

थ्रीजी क्रांतीनंतर आता फोरजी तंत्रज्ञानानं भारतात शिरकाव केलाय. त्यामुळं ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरुन अवघ्या दोनच मिनिटांत अख्खा सिनेमा डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. तसंच घराघरात आता घराघरांमध्ये ‘वायफाय’ तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 7, 2014, 06:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
थ्रीजी क्रांतीनंतर आता फोरजी तंत्रज्ञानानं भारतात शिरकाव केलाय. त्यामुळं ग्राहकांना आता आपल्या मोबाईलवरुन अवघ्या दोनच मिनिटांत अख्खा सिनेमा डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. तसंच घराघरात आता घराघरांमध्ये ‘वायफाय’ तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय रिलायन्सनं घेतलाय.
मोबाईलवरुन सिनेमा पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. थ्रीजीनंतर आता ४९ मेगाबाईट प्रतिसेकंदाच्या वेगानं डाऊनलोड आणि अपलोड करण्याची सोय फोरजीमुळं उपलब्ध होणार आहे. हे फोरजी तंत्रज्ञान थ्रीजीच्या तुलनेत १० ते १२पटीनं वेगवान असून यानं मोबाईल इंटरनेटच्या दुनियेत क्रांती होणार आहे.
यूजर्सला ६०० मेगाबाईटचा चित्रपट दोन मिनिटांत डाऊनलोड करता येणार आहे. डीश टीव्ही सेटवरसुद्धा माहिती डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. रिलायन्स कंपनी घरामध्ये वायफाय पुरविण्याचा विचार करतेय. त्यामुळं ग्राहकांना फोरजीसोबतच १५० चॅनल्सही टीव्हीवर पाहायला मिळणार आहेत. हे चॅनस मोबाईलसुद्धा पाहता येतील, असं रिलायन्स जिओ इंफोकॉम कंपनीच्या प्रवक्त्यानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.