www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
वर्ल्ड वाईड वेब म्हणजे www वर एखाद्या छोट्या कंपनीने आपल्या ब्रँडची किंवा लोगोमध्ये बदल करणे ही काही विशेष बाब नाही. पण फेसबूक सारख्या कोट्यवधी फॉलो करणाऱ्या साइटने आपल्या लोगोमध्ये बदल केला ही खूप मोठी गोष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपण फेसबूकचा लोगो जसा पाहतो आता तो तसा दिसणार नाही. त्यात फेसबूकने छोटासा बदल केला आहे.
काय बदल केला फेसबूकने
फेसबूकने आपल्या लोगोतील “F” या अद्याक्षराखालील निळी रेषा काढली आहे. अक्षर हे अजूनही स्मॉल लिपीमध्येच आहे. त्यामुळे आपल्याला बदल झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. पण बदल झाला आहे हे नक्की. तसेच “f” हे अक्षर निळ्या बॉक्सला कट करणारे आहे.
तुम्ही जर लक्ष देऊन पाहिले तर हा नवा लोगो आणि बदल आपल्याला ग्राफ सर्च, नवीन टाइम लाइन, नवीन न्यूज फीड, फेसबूक होम पेज आणि असा बऱ्याच ठिकाणी दिसू शकतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.