सॅमसंगचा नवा `गॅलेक्सी झूम K` लॉन्च!

सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे.

Updated: Apr 29, 2014, 01:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंगापूर
सॅमसंगने आपला एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. `गॅलक्सी झूम K` हा नवीन स्मार्टफोन सॅमसंगने सिंगापूर येथे लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन लॉन्च करण्याआधी कंपनीने `कॅप्चर दि मुवमेंट` ही टॅग लाईन देऊन स्मार्टफोनची जाहिरात केली होती.
हा एक खास स्मार्टफोन आहे, कारण हा स्मार्टफोन एका डिजीटल कॅमेराचे फीचर्स देतो. या स्मार्टफोनमध्ये `१० एक्स` झूम असून कॅमेरामध्येच स्मार्टफोनची टेक्नोलॉजी टाकण्यात आली आहे. याआधी सॅमसंगने `गॅलेक्सी S4` लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन देखील खूपच लोकप्रिय झाला होता.
आता सॅमसंगकडून K व्हर्जन लॉन्च करण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये २०.७ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. यात फिजिकल कॅमेरा लेंन्स देण्यात आली आहे. सोबतच यात ऑप्टिकल इमेज स्टेबलायझर देखील आहे. ऑप्टिकल इमेज स्टेबलायझर इमेज क्वालिटी चांगली करते.
शिवाय स्मार्टफोनमध्ये काही असे फीचर्स देण्यात आले की, आपल्याला आता स्मार्टफोनसोबत वेगळा कॅमेरा ठेवण्याची गरज लागणारच नाही. विशेष म्हणजे मीडियातील लोकांसाठी हा स्मार्टफोन चांगलाच उपयुक्त ठरणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.