www.24taas.com,झी मीडिया,नवी दिल्ली
कारमधील प्रसिद्ध असे नाव म्हणजे स्कोडा... याच स्कोडा कंपनीने भारतीय बाजारात सिडान कार एका नव्या स्वरुपात आणलीय. फारच आकर्षक आणि दमदार इंजिनची क्षमता असलेली ही कार स्कोडा ‘रॅपिड लेजर’च्या नावाने बाजारात दाखल झालीय. कंपनीने या लेजरची किंमत दिल्लीतील शोरुममध्ये ९.०६ लाख इतकी ठेवलीय.
नव्या स्वरुपातील या गाडीला पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आलीय. पेट्रोलच्या प्रकारामध्ये कंपनीने ६-स्पीड ऑटोमेटिक गियर बॉक्स आणि डीजल प्रकारामध्ये मॅन्युअल गियर बॉक्सचा वापर करण्यात आलाय. स्कोडाच्या रॅपिड लेजरमध्ये १.६ लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा वापर करण्यात आलाय.
पेट्रोल इंजिन गाडी साधारण १२ किलोमीटर आणि डीझेल इंजिन गाडी १५ किलोमीटरचा मायलेज देते. रॅपिडचे इंटिरियर सादर करताना गाडीतील जागेचंही भान ठेवलं गेलंय. स्कोडाने या गाडीत चांगल्या नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर केलाय तसेच यामध्ये पोर्टेबल स्क्रीनचा वापर करण्यात आलाय.
स्कोडा रॅपिडचे काही खास फीचर्स
> रिवर्सिंग कॅमेरा
> अॅडिशनल इक्विपमेंट
> लेजर पॅकेज
> रियर पार्किंग सेंसर
> १५ इंच अलॉय
> लेदर सीट कव्हर
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.