www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन
सध्या वॉट्स अॅपचा जमाना आहे. मात्र तर वॉट्स अॅपवर खूप मॅसेजेस केल्यानंतर तुमचं मनगट दुखत असेल तर लक्षात घ्या तुम्हाला वॉट्सअॅपिटिस झालाय.
ब्रिटीश मेडिकल जर्नल `द लँसेट` समोर वॉट्सअॅपिटिसची पहिली ऑफिशिअल केस समोर आलीय. स्पेनमधील एका गरोदर महिलेनं खूप वेळेपर्यंत वॉट्स अॅपचा वापर केल्यानं तिचं मनगट खूप दुखायला लागलं.
या महिलेनं सतत ६ तास वॉट्स अॅपचा वापर केला होता. ज्यामुळं तिला मनगटाचं दु:ख सहन करावं लागलं. त्यानंतर पेशंटला म्हणजेच त्या महिलेला वॉट्सअॅपिटिसपासून मुक्त होण्यासाठी त्याचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आलाय.
त्यामुळं जर खूप वेळ वॉट्स अॅपचा वापर केला आणि तुमचा हात, मनगटात दु:ख असलं तर तुम्ही पण त्यापासून दूर राहा असा सल्ला पीडित महिलेनं दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.