व्हिडिओ : भर रस्त्यावर `तो` तडफडून मरताना...

नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 14, 2014, 10:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
नवी दिल्लीत निर्भया प्रकरणानंतर जनता जागृत झाली असेल... रस्त्यावर कुणी मदतीची याचना केली तर त्यांना मदतीसाठी बघ्यांनी केवळ पाहत न राहता मदतीची भूमिका घेण्याचा निश्चय केला असेल... असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचं ठरता...
भर रस्त्यावर एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असेल आणि तो जीवाच्या आकांताने मदतीसाठी रडून भीक मागत असेल, अशा वेळी रस्त्यावर त्याला पाहणारे लोक काय भूमिका घेतात, हे पाहायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायलाच हवा...
रस्त्यावर एक तरुण रक्तानं बरबटलेला असताना आणि लोकांकडे मदत मागताना... पोलिसांची मदत मिळवण्यासाठी 100 नंबरवर किंवा अॅम्ब्युलन्ससाठी 101 नंबरवर कुणालाही फोन करावासा वाटला नाही... किंवा कुणी लिफ्टसाठी आपली गाडी किंवा बाईक उभं करण्याचीही तसदी घेतली नाही... असंच या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय.
आपण माणुसकीपासूनच दिवसेंदिवस कसं दूर जात आहोत, हे सांगण्याचा हा एका अभिनेत्याचा हा प्रयत्न... हा व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर व्हायरल होतोय. आत्तापर्यंत हा व्हिडिओ 2 लाख 23 हजार 868 लोकांनी पाहिलाय.

व्हिडिओ पाहा -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.