www.24taas.com, झी मीडिया, कल्याण
कल्याण स्टेशनमध्ये आज सरकत्या जिन्याचं उद्घाटन करण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातला हा तिसरा सरकता जिना आहे. यापूर्वी ठाणे आणि डोंबिवलीत हे सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत.
पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आलं. यावेळी खासदार आनंद परांजपे, खासदार, सुरेश टावरे, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रकाश भोईर आणि मध्य रेल्वेचे डीआरएम मुकेश निगम उपस्थित होते. कल्याणमधून दररोज ४५० गाड्या आणि दोन लाख प्रवासी प्रवास करतात. सरकत्या जिन्यांमुळे इथून प्रवास करणाऱ्या लहान मुले, महिला, रुग्ण आणि अपंगांना प्रवास करणं सोपं जाणार आहे.
कल्याण पश्चिमेप्रमाणे पूर्वेलाही स्कायवॉक आणि सरकते जिन्यांची सोय करण्यात येणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’नं १४ कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर केल्याचं यावेळी खासदार आनंद परांजपे यांनी भाषणादरम्यान म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.