www.24taas.com, रत्नागिरी
आंबा प्रेमींसाठी खूषखबर... पोषक हवामानामुळे यंदा कोकणचा प्रसिध्द हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला लवकर येण्याची शक्यता आहे. रत्नागिरीतून पहिली आंब्याची पेटी कोल्हापूरला रवाना झालीय. यंदाच्या या पहिल्या-वहिल्या चार डझनच्या पेटीचा भाव आङे... दहा हजार रुपये
दरवर्षीप्रमाणे यंदाही खराब हवामानाचा फटका अनेक आंबा व्यापाऱ्यांना बसला. ऑगस्टमध्ये फवारणी झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत पाऊस लांबल्याने व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र, सध्या आंबा पिकास पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर फळधारणाही योग्य झाली. रत्नागिरीतून पहिली हापूसची पेटी कोल्हापूरला पाठविण्याचा मान रत्नागिरीच्या वाडकर कुटूंबाला मिळाला आहे.
सध्या आंबा पिकाला पोषक हवामान असलं तरी लवकर येणाऱ्या आंब्याचा भाव मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असणार आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना आंब्याची चव चाखण्यासाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे.