हार्बर रेल्वे खोळंबली, पत्रे उडून ओव्हरहेड वायर तुटली

ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे.

Updated: Mar 7, 2013, 04:40 PM IST

www.24taas.com, रबाळे
ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे. तब्बल अडीच तासापासून हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. अजूनही वाहतूक पूर्ववत न झाल्याने हार्बर रेल्वे खोंळबल्या आहेत.
त्यामुळं ठाण्याहून वाशी आणि पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झालीये. दुपारी अडीच्या सुमारास ही घटना घडली आहे. रुळांवरील पत्रे हटवण्याचं काम सुरु झालं असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे.
रेल्वे ठप्प असल्यानं प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गर्दी झाली आहे. ओव्हरहेड वायर कधी दुरूस्त होणार याचीच सारे प्रवासी वाट पाहत आहेत.