कोकण रेल्वे पोलिसांची अशीही दक्षता...

कोकण रेल्वेमध्ये तृतीय पंथीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी एक वेगळीच घटना पुढे आली. घरातून पळालेला 14 वर्षीय शाळकरी मुलगा कोकण रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे त्या मुलाला आई-वडिलांकडे सोपविण्यात आले.

Updated: Jul 9, 2014, 04:05 PM IST
कोकण रेल्वे पोलिसांची अशीही दक्षता... title=

मुंबई : कोकण रेल्वेमध्ये तृतीय पंथीचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईच्यावेळी एक वेगळीच घटना पुढे आली. घरातून पळालेला 14 वर्षीय शाळकरी मुलगा कोकण रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे त्या मुलाला आई-वडिलांकडे सोपविण्यात आले.

शाळेत अभ्यास न केल्याने आणि कमी मार्क मिळाल्याने वडील मुलाला ओरडलेत. त्यामुळे नाराज असलेला 14 वर्षीय शाळकरी मुलगा पळून आला. कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पूर्णा एक्सप्रेसमध्ये जनरल डब्यात शाळेच्या ड्रेसवर प्रवास करताना तो आढळून आला. उपनिरीक्षक संतोष गावकर, हवालदार प्रवीण के यांच्या दक्षतेमुळे मुलाला कर्नाटक कुंदापूर येथील स्टेशनवर  ताब्यात घेतले. रेल्वे पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर त्यांने संधिग्ध उत्तरे दिलीत. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्याला चौकशीसाठी आरपीएफच्या आऊटपोस्टमध्ये आणले. त्यानंतर त्याला काही प्रश्न विचारल्यानंतर त्यांने मी घरातून पळून आलो आहे. मला पश्चिम बंगाल येथे नातेवाईकांकडे जायचे आहे. मला पुन्हा घरात जायचे नाही. मी झाली सायकल कुंदापूर स्टेशनवर ठेवली आहे, अशी माहिती दिली. त्यानंतर पोलीसही चक्रावलेत.

मुलाचा अंदाज घेत रेल्वे पोलिसांनी त्या मुलाच्या घरी संपर्क साधला. त्यावेळी मुलाच्या वडिलांना धक्का बसला. आखाती देशात चालकाची नोकरी करणारे त्याचे वडिल सुट्टीनिमित्त गावी आले होते. मुलाचे सायंकाळी भेटकणे बंद होण्यासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे, अशी वडिलांची अपेक्षा होती. मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर ते मुलावर रागावले. एवढेच कारण घेऊन मुलगा चक्क घर सोडून पश्चिम बंगालमध्ये नातेवाईकांकडे निघाला होता.

पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मुलाचे वडील आरपीएफच्या आऊटपोस्टमध्ये दाखल झालेत. मुलाची माहिती दिल्यानंतर मुलगा त्यांच्याबरोबर जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याच्या गावातील पालक संघटनेचे अध्यक्ष राधाकृष्ण भट यांच्याशी संपर्क केला. त्यांनाही पोलिसांनी बोलावून घेतले. पोलीस, पालक आणि पालक संघटनेच्या अध्यक्षांच्या मध्यस्तीने मुलगा अखेर राजी झाला. त्यांने असे पुन्हा काहीही करणार नाही, असे सांगून पुन्हा घरी गेला. कोकण रेल्वे पोलिसांच्या दक्षतेमुळे मुलगा मिळाल्याचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.