आठवलेंनी घेतली आव्हाडांची भेट

राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रिपाईचे नेते रामदास आठवले यांची ठाण्यात भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा रंगली आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 5, 2013, 10:03 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी रिपाईचे नेते रामदास आठवले यांची ठाण्यात भेट घेतली. या दोघांच्या भेटीमुळं राजकीय चर्चा रंगली आहे.
आठवलेंची आपण सदिच्छा भेट घेतल्याचं आव्हाडांनी सांगितलंय. मात्र त्याचवेळी आठवलेंनी शिवसेनेसोबत जाऊ नये यासाठी आपण त्य़ांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आव्हाडांनी स्पष्ट केलं.
आठवले महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं नाराज आठवलेंना गळाला लावण्याचे राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे का असा अशी चर्चा राजकीय विश्वात रंगलीय.
आठवले आज सकाळी सांगलीत महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत होते. तर संध्याकाळी राष्ट्रवादीच्या आव्हाडांसोबत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आठवलेंनी शिवसेनेसोबत जाऊ नये, मी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.