www.24taas.com, ठाणे
ठाण्यातील शिळफाटा येथील बिल्डिंग कोसळल्यानंतर दुर्घटनेनंतर या दुर्घटनेला जबाबदार असणारे दोन्ही बिल्डर फरार झालेत. या घटनेच्या दुसऱ्या दिवशीही बिल्डर सलीम शेख आणि जमील कुरेशी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. शेख आणि कुरेशी यांनी या इमारतीचं अनधिकृत बांधकाम केवळ तीन महिन्यात पूर्ण केलं होतं.
जमील कुरेशीला कुणाचा आशीर्वाद
जमील कुरेशी हा बसपाचा कार्यकर्ता आहे. ठाणे बिल्डिंग दुर्घटनेला जबाबादार असणारा बिल्डर जमील कुरेशी याचा फोटो ‘झी २४ तास’च्या हाती लागला आहे. ६३ जणांच्या मृत्यूला हेच दोन यमदूत जबाबदार आहेत. जमील कुरेशी हा गेल्या पाच वर्षांपासून तो बांधकाम व्यवसायात आहे. यानचं केवळ महिन्यांत बिल्डिंग उभी करण्याचा पराक्रम केला होता. आता या दुर्घटनेनंतर तो फरार झालाय. त्याला कुणाचा आशीर्वाद आहे, याची चर्चा आता सुरु झालीय. बिल्डिंग बाँधताना कारवाई झाली नाही, आता तरी होणार का, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित झालाय.