www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमा दरम्यान शिवसेना, काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना काळे झेंडे दाखवून कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.
भिवंडी महापालिकेत भ्रष्ट कारभार चालतो असा आरोप करत हा बहिष्कार टाकण्यात आला. तसेच भिवंडीतील राष्ट्रवादीचे झेंडेही उतरवण्यासाठी आग्रह धरला. अखेर पोलिसांना राष्टवादीचे काही झेंडे काढावे लागले. या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या अजुबाच्या परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना काही कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यावे लागले तर काही कार्यकार्त्यांवर बळाचा वापर करावा लागला.
कळवा आणि मुंब्रा परिसरातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाकरिता राष्टवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रिय कृषीमंत्री शरद पवार हे आज ठाण्यात आले. विशेष म्हणजे शरद पवार आज लोकलनं मुंब्रा ते कळवा असा प्रवास केला. पवारांनी यावेळी ज्येष्ठ नागरिक दालन, खाडी किना-यावरील उद्यान, मुंब्रा रेल्वे स्टेशन परिसरात ७५ टन लोखंड वापरून तयार करण्यात आलेला दरवाजा, तसंच उर्दू वाचनालयाचं उद्घाटनही केलं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.