www.24taas,com, झी मीडिया, ठाणे
ठाणे जिल्हा परिषदेमधील ग्रामीण भागातील शिक्षकांच्या बदल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचं सांगून त्याविरोधात जिल्हापरिषद शिक्षक आणि सभादांनी आंदोलन केलंय. वारंवार मागणी करून सुध्दा त्याकडे शासन आणि जिल्हा अधिका-यांनी पाठ फिरवल्यानं त्याविरोधात शिक्षकांनी रात्रभर ठिय्या आंदोलन केलंय. विशेष म्हणजे या आंदोलनात महिला शिक्षिकाही सामील होत्या.
शासनाचा कोणत्याही अधिका-याने या आंदोलनाला भेट दिली नाहीये. ग्रामीण भागातील अतिरिक्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्यात त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षकां शहरी भागात येण्यापासून वंचित राहीला तसेच ग्रामीण भागातील शिक्षकांना बढती देण्यात आली नाहीये.
या दोन्ही अन्यायकारक गोष्टी करून शासनाने शिक्षकांची थट्टा केल्याचा आरोप करून ठिय्या आंदोलन केलंय. जोवर मागण्यापूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा सेना आणि शिक्षक संघटनांनी दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.