www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा परिसराचा दौरा केलाय. या दौऱ्यात त्यांनी शिवसेनेतर्फे मोखाडा तालुक्यात सुरु असलेल्या कुपोषित बालक आणि गरोदर मातांच्या आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा आढावा घेतला. शिवाय कुपोषित बालकं त्याच्या मातांना मिठाई,साडी चोळी वाटपही केली.
तसंच कारेगाव इथल्या आश्रमशाळेत जावून तिथल्या मुलांनी मिठाई वाटप करुन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. कुपोषणामुळं नेहमीच चर्तेत असणाऱ्या मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यात शिवसेनेतर्फे आरोग्य तपासणी शिबीर गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असून यामध्ये आता पर्यत ७९० लहान मुलं आणि ७२ गरोदर महिलांची तपासणी करण्यात आलीय.
मोखाड्यात आतापर्यंत सात ठिकाणी हे शिबीर झालं असून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात चार वेळा, मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दोन वेळा तर मोरांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकदा शिबीर आयोजित करण्यात आला आहे. या शिवाय मोखाड्यात शिवसेनेतर्फे लवकरच भव्य हॉस्पिटल आणि शाळा बांधणार असल्याचंही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.