बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारला

आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट सादर केलं. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलं. नोटाबंदीनंतरचं हे पहिलं बजेट असल्याने त्यावर अनेकांचं लक्ष होतं. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारतांना दिसला.

Updated: Feb 1, 2017, 05:10 PM IST
बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारला title=

मुंबई : आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेट सादर केलं. यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलं. नोटाबंदीनंतरचं हे पहिलं बजेट असल्याने त्यावर अनेकांचं लक्ष होतं. बजेट सादर झाल्यानंतर शेअर बाजार वधारतांना दिसला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 408 अंशांनी वधारला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 119 अंशांची वाढला. बांधकाम आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्स सर्वाधिक वधारले. ऑटो, एफएमसीजीमध्ये ही वाढ पाहायला मिळाली.
 
पीएसयू बॅंक निर्देशांक 3.2 टक्के आणि खाजगी बँकांचा निर्देशांक 1.6 टक्क्यांनी वधारला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील खरेदीचा जोर आहे. मुंबई शेअर बाजारात आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक, एचडीएफसी, आयटीसी, गेल यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर एचसीएल टेक, टीसीएस, आयडिया सेल्युलर, टेक महिंद्रा, अरबिंदो फार्मा, डॉ रेड्डीज, इन्फोसिस, सन फार्मा आणि लुपिन यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.