मुख्य दरवाजासमोर आरसा नसावा. अनेक घरामध्ये गेल्यानंतर असे आढळते, की घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवलेला आढळतो. असा आरसा असणे हे हानीकारक आहे.
कारण मुख्य दरवाजातून चांगली उर्जा परावर्तित होऊन मुख्य दरवाजानेच निघून जाते. तसेच मुख्य दरवाजासमोरची मोकळी भिंतही अशुभ मानली जाते. पण म्हणून त्यावर आरसा लावून दोषमुक्त करणे हे अत्यंत चुकीचे आहे.
आरशाऐवेजी त्यावर निसर्गचित्र लावावे. हे चित्र जंगालात दूर दूर जाणार्या पायवाटांचे किंवा निमुळत्या होत गेलेल्या पायवाटांचे असावे, म्हणजे पाहणार्याला प्रतीकात्मक रीतीने अधिक विस्तार असल्याचा भास झाला पाहिजे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.