www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
थंडपेयं जास्त पिण्यानं मुलांमधली आक्रमकता वाढत असून त्यांच्यातली एकाग्रता कमी होते. समाजापासून दूर राहण्याच्या मुलांच्या प्रवृत्तीतही थंडपेयांमुळं वाढ होते.
कोलंबिया विद्यापीठाच्या मेलमॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, वेरमाँट विद्यापीठ आणि हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ यांनी केलेल्या अभ्यासानुसार हे पुढं आलंय. पाच वर्षीय जवळपास तीन हजार मुलाच्या खाण्या-पिण्याच्या सवयींचं परिक्षण आमि अभ्यास करुन ही बाब पुढं आलीय.
यात अमेरिकेतल्या २० मोठ्या शहरांमधील मुलांच्या आईकडून त्यांच्या थंडपेय पिण्याच्या सवयींविषयी माहिती घेण्यात आली. जवळपास ४३ टक्के मुलं दररोज कमीतकमी एक ग्लास थंडपेय पितात. आणि चार टक्के मुलं याही पेक्षा जास्त थंडपेय पितात, असं अभ्यासकर्त्यांना या सर्वेक्षणानंतर आढळलं.
थंडपेयांमध्ये असलेला सोडा हा त्यांच्यातल्या आक्रमकतेला वाढवतो. शिवाय मुलांमधली एकाग्रता कमी करण्यातही थंडपेय कारणीभूत ठरतायेत.
जी मुलं दररोज चार किंवा त्यापेक्षा जास्त थंडपेय पितात. ती मुलं इतर मुलांच्या तुलनेत तोडफोड जास्त करतात. आपल्या वयाच्या मुलांसोबत ते मारहाण करतात आणि भांडणं जास्त करतात, असं या अभ्यासानुसार स्पष्ट झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.