`जंक फूड`चे डोहाळे पडतील बाळाला भारी...

गर्भावस्थेत वेफर्स, न्यूडल्स, बिस्किटसारखं जंक फूड खाल्लं तर ते येणाऱ्या बाळासाठी अत्यंत हानीकारक ठरू शकतं पोहचवू शकते. हा त्रास काहिसा धुम्रपानामुळे होणाऱ्या त्रासासारखाच असू शकतो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Oct 24, 2012, 04:51 PM IST

www.24taas.com, लंडन
गर्भावस्थेत वेफर्स, न्यूडल्स, बिस्किटसारखं जंक फूड खाल्लं तर ते येणाऱ्या बाळासाठी अत्यंत हानीकारक ठरू शकतं पोहचवू शकते. हा त्रास काहिसा धुम्रपानामुळे होणाऱ्या त्रासासारखाच असू शकतो.
बार्सिलोनामधील ‘सेन्टर फॉर रिसर्च इन एनव्हायरमेंटल एपिडेमियोलॉजी’च्या मार्गदर्शनाखाली संशोधन करताना ही गोष्ट पुढे आलीय. गरोदर अवस्थेत आईनं जास्त प्रमाणात जंक फूड खाल्लं तर त्याचा घातक परिणाम मुलांवर होऊ शकतो. त्यामुळे जन्माला येताना बाळाचं वजन कमी असण्याची शक्यताही बळावते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, बटाट्याचे तळलेले वेफर्सही गर्भावस्थेतील बाळासाठी तेवढेचं हानिकारक आहेत जेवढं धूम्रपान...
जंक फूडमध्ये सामान्यत: आढळणारा ‘एक्रिलामाईड’ला हा घातक पदार्थ या हानीकारक गोष्टींना जबाबदार असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. या प्रयोगासाठी संशोधकांनी २००६ ते २०१० मध्ये डेन्मार्क, इंग्लंड, युनान, नॉर्वे आणि स्पेन या देशांत ११०० गरोदर महिलांच्या जेवणाचा अभ्यास केला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x