www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई
महिला आयुष्यभरात जवळजवळ दीडशे वेगवेगल्या हेअर स्टाईल आजमावून पाहतात, असं एका संशोधनात आढळून आलंय. यामध्ये केसांचा आकार, रंगछटा व कटचा समावेश आहे. या अभ्यासासाठी दोन हजार महिलांच्या केशरचन आणि केसांबद्दलच्या आवडीनिवडी अभ्यासण्यात आल्या.
त्यामध्ये हेअरड्रेसरकडे जाताना प्रत्येक वेळी नवी केशरचना असावी अशी २० पैकी एका महिलेची इच्छा असते. ५० टक्के महिलांना केशरचनेबाबत विविध प्रयोग करायला आवडते. महिलांना दोन नव्या हेअर स्टाइल करायला आवडतात. शिवाय वर्षातून एकवेळ केसाचा रंग बदलण्यास त्या प्राधान्य देतात. १५ ते ६५ वयादरम्यान १०० वेळा केसांचा रंग बदलला जातो.
कंटाळा आला म्हणून बदल करणाऱ्या महिलांचे प्रमाण ६४ टक्के आहे.
सेलिब्रिटींसारखी हेअर स्टाईल असावी म्हणून त्यात बदल करणाऱ्या महिलांचे प्रमाण १२ टक्के आहे तर विवाहासाठी केशरचना बदलणाऱ्या मुली, महिलांचे प्रमाण १५ टक्के आहे. १०० पैंकी १३ महिला अपत्यप्राप्तीनंतर केशरचना बदलतात. नवा लूक दिसण्यासाठी वाढदिवस व ब्रेकअप हे महिलांसाठी निमित्त ठरते. महिला वर्षाकाठी पाच वेळा हेअर ड्रेसर्सकडे जातात, असं ‘टोनी अँड गाय स्टाइलिस्ट’ने केलेल्या अभ्यासात समोर आलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.