www.24taas.com, वृत्तसंस्था, स्टॉकहोम, स्वीडन
स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.
गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आलेल्या या सर्व महिला एक तर गर्भाशयाविनाच जन्माला आल्या होत्या किंवा कर्करोगामुळं त्यांचं गर्भाशय काढून टाकावं लागलं होतं. सर्व जणी तिशीतील प्रत्यारोपण केलेल्या सर्व जणी वयाच्या तिशीतील असून महिलांमध्ये गर्भाशय प्रत्यारोपण करणं शक्य आहे का, हे आजमावून पाहण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या एका महत्त्वाकांक्षी वैद्यकीय प्रयोगाचा एक भाग म्हणून त्यांच्यावर या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
अपत्य जन्माबद्दल प्रश्नचिन्ह ही पूर्णपणे नवी शस्त्रक्रिया होती आणि ती करताना आम्हाला संदर्भासाठी कोणत्याही पाठय़पुस्तकाचा आधार नव्हता, असं डॉ. ब्रॅनस्टॉर्म यांनी सांगितलं. प्रजोत्पत्ती तज्ज्ञांनी या शस्त्रक्रियांचं कौतुक केलं असलं, तरी पण अशा प्रत्यारोपणातून खरोखरच निरोगी अपत्य जन्म होऊ शकतो का, हे अद्याप स्पष्ट व्हायचंय.
अमेरिका, ब्रिटन आणि हंगेरी अन्य काही देशांमध्येही गर्भाशय प्रत्यारोपणाच्या दिशेनं डॉक्टरमंडळी प्रयत्न करीत आहेत. पण स्वीडनमधील प्रयत्न यात सर्वात प्रगत आहेत. या शस्त्रक्रिया गोटेनबर्ग विद्यापीठाच्या स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र विभागात केल्या गेल्या. गर्भाशय प्रत्यारोपण केल्यानंतर या नऊही महिला उत्तम प्रगती करीत असून, त्यापैकी अनेकींची शस्त्रक्रियेनंतर सहा आठवड्यांत नियमित मासिक पाळीही सुरू झाली आहे. त्यांचं प्रत्यारोपित गर्भाशय सुदृढ आणि उत्तमपणे काम करीत असल्याचं हे लक्षण आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.