ब्लॅकबेरीची शरणागती, सर्व्हर मुंबईत

ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजिंग सेवेत सरकारला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास विरोध करणारी ब्लॅकबेरी (कंपनी-रिसर्च इन मोशन) अखेर दोन पावलं मागे आली. ब्लॅकबेरी कंपनीने मुंबईत आपला सर्व्हर लावल्याचे जाहीर केले आहे.

Updated: Feb 21, 2012, 08:51 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

ब्लॅकबेरी फोनच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या मेसेजिंग सेवेत सरकारला कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्यास विरोध करणारी ब्लॅकबेरी (कंपनी-रिसर्च इन मोशन) अखेर दोन पावलं मागे आली.  ब्लॅकबेरी कंपनीने मुंबईत आपला सर्व्हर लावल्याचे जाहीर केले आहे.

 

 

ब्लॅकबेरी या फोन कंपनीने आपल्या कामात कोणालाही हस्तक्षेप करण्यास मज्जाव केला होता. आपला सर्व्हरही भारतात बसवला नव्हता. मात्र, यामुळे भारताला ब्लॅकबेरीच्या सेवेमुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे यावर आक्षेप घेण्यात आला. त्यानंतरही ब्लॅकबेरीने एक पाऊल मागे न हटण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे केंद्राने यापुढे आपली सेवा बंद करण्याचा इशारा दिला होता. गरज भासल्यास सरकारला कशा पद्धतीने हस्तक्षेप करता येऊ शकेल, याचे सविस्तर प्रेङोंटेशनही केंद्रीय गृहमंत्रलयासोबत झालेल्या बैठकीत ब्लॅकबेरीच्या रिसर्च इन मोशन कंपनीच्या अधिका ऱ्यांनी दिले.

 

 

भारतात ब्लॅकबेरीचा सर्व्हर नसल्याने ब्लॅकबेरीवरील ई-मेल्स आणि मेसेजेस यात हस्तक्षेप करणे शक्य नव्हते. परिणामी, देशाच्या सुरक्षेस बाधा येऊ शकते, या मुद्दय़ावरून ब्लॅकबेरीचे केंद्राशी चांगलेच वाजले होते. त्यामुळे गांभीर्याने पावले उचल कारवाई करण्याचा इशाला देताना ब्लॅकबेरीची सेवाच बंद करण्याचे ठरविण्यात होत. जर ब्लॅकबेरीची सेवा बंद झाली असती तर ब्लॅकबेरीला मोठे नुकसान सोसावे लागले असते. पुन्हा ग्राहक मिळविणे ब्लॅकबेरी कंपनीला शक्य झाले नसते. याचा विचार करून ब्लॅकबेरीने मुंबईत आपला सर्व्हर मुंबईत बसविण्याच निर्णय घेतला.