15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत

खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो. 

Updated: Jan 19, 2015, 04:33 PM IST
15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत title=

मुंबई : खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो. 

पण जुना फोन विकताना आपला फोन हा त्यासाठी चांगल्या अवस्थेत असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपला जुना फोन विकून त्याला जास्त किंमत भेटेल आणि नवीन फोन घेताना आपल्याला कमी खर्च पडेल. 

दिवसेंदिवस बाजारभाव वाढत चालला आहे, पण तरीही काही टिप्समुळे आपण आपल्या गॅजेट्सला चांगली किंमत मिळवून देऊ शकतो.

1) सर्वातमहत्वाची गोष्ट म्हणजे जे दिसत तेच विकलं जातं, म्हणजे आपला फोन यासाठी चांगल्या अवस्थेत असणे आवश्यक आहे. 

2) जर फोनचे कवर जुने झालं असेल किंवा स्क्रॅच असेल, तर एखाद्या स्वस्त पण आकर्षक फोनला कवर लावा. 

3) जर फोनचे आोरिजनल बॅाक्स, चार्जर, डेटा केबल बरोबर असेल तर चांगली डिल होऊ शकते. 

4) फोन नेहमी साफ आणि चांगला ठेवा तसेच आपले कॅान्टॅक्ट, डेटा इ. डिलीट करा. 

5) शक्यतो फोनला फॅक्ट्री रीसेट करा. 

6) डील करण्याआधी वेगवेगऴ्या ठिकाणी ऑफर ची माहिती घ्या. 

7) ऑनलाइन वेबसाइटची मदत घेऊनही आपण आपले गॅजेट्सला चांगली किंमत मिळवून देऊ शकतो.
 
8) जर तुम्ही तुमचा फोन रिटेल आउटलेट्समध्ये एक्सचेंज करत असाल तर इतर ठिकाणीसुद्धा एक्सचेंज ऑफर तपासून बघा. 

9) सणासुदीच्या काळातही चांगल्या एक्सचेंज ऑफर असतात त्यासाठीही तुम्ही थांबू शकता. 

10) कधी कधी नवीन फोन लॅान्च होतो किंवा एखाद्या मोठ्या कंपनीचा फोन लॅान्च होतो तेव्हाही एक्सचेंज ऑफर येतात. 

11) जर तुमचा फोन वॅारंटीमध्ये असेल तर सोन्याहून पिवऴे कारण त्यामुऴे तुम्हाला तुमची डील करण्यास याचा खूप फायदा होईल. 

12) जर ऑनलाइन डिल करत असाल तर त्याचे ईमेल, मॅसेज आणि सर्व ट्रॅक रेकॅार्ड्स सांभाऴून ठेवा. 

13) तुमच्या फोन चे कॅाल ड्युरेशन इ. रिसेट करू नका. त्यामुऴे फोन चा किती वापर झाला आहे हे ग्राहकाला समजू शकते. 

14) आवश्यक तेवढेच अॅप ठेउन बाकीचे अॅप आणि गेम्स अन-इंस्टॅाल करावे. 

15) जर तुम्ही अॅप ला लाइनित इंस्टॅाल करण्यासाठी 'रूट' केला असेल तर त्याला 'अनरूट' करा. त्यासाठी 'मोबोजिनी' किंवा दुसऱ्या अॅपची मदत घेऊ शकता. आपल्या फोनचा डेटा बॅकअप जरूर घ्या.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.