Tips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा!

आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं . 

Updated: Jan 19, 2015, 11:25 AM IST
Tips:आपल्या स्मार्टफोनचं बिल कमी करा! title=

मुंबई: आपण आहोत टेक्नॉलॉजीच्या युगात... आपल्या स्मार्टफोनचा वापर आणि त्याचा लूक दिवसेंदिवस बदलतोय. पहिले फोनचं बिल हे कॉल आणि एसएमएसवर अवलंबून होतं. आता त्यात इंटरनेटचा जास्त वाटा असतो. आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या विविध अॅप्समुळे बिल चांगलंच वाढतं . 

पण आपलं हेच बिल काही प्रयत्नांनी आपण कमी करू शकता... त्यासाठी या खास ११ टिप्स...

१. सर्वात आधी आपल्या स्मार्टफोनमधून असे सर्व अॅप Uninstall करा ज्याचा तुम्ही कधीच वापर करत नाही. कारण असे अॅप अपडेट होतात आणि उगाचच डेटा खर्च होतो.

२. जर आपल्याला अॅप अन इन्सॉल करायचे नसेल तर सेटिंग्जमध्ये जावून ऑटो अपडेटला ऑफ किंवा डिसेबल करा. यासाठी आपण अॅप मॅनेजर सारख्या प्रोग्रॅमचा वापर करू शकतो.

३. आपल्यासाठी आवश्यक नसलेल्या अॅपचे अपडेट नोटिफिकेशन Ignore करा. हे गरजेचं नाहीय की आलेलं प्रत्येक अपडेट इंस्टॉल करायला हवं. पण OS संबंधीत अपडेट इंस्टॉल करणं आवश्यक आहे. कारण त्यामुळं फोनच्या परफॉर्मेन्सला फायदाच होतो.

४. जर आपण You Tube वर व्हिडिओ अपलोड करत असाल तर फोन ऐवजी पीसीमधून अपलोड करा. आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये HD कॅमेरा असतो. अशातच छोटा HD व्हिडिओ सुद्धा २०० MB साइजचा असतो. म्हणून असा हेवी व्हिडिओ अपलोड करणं आवश्यक नसेल तर जरूर टाळावा.

५. व्हॉट्स अॅप आणि वायबर सारख्या अॅपचा वापर करत असाल. तर मित्रांनी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ डाऊनलोड करण्यापासून वाचा. 

६. डेटा खर्च कमी करायचा असेल तर व्हिडिओ चॅट करू नका. मान्य आहे हे नवं आहे. स्मार्टफोन आहे स्टेटस जपावं लागतं, पण म्हणून प्रत्येकालाच व्हिडिओ कॉलिंग करणं चुकीचं आहे. 

७. व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या २-३ अॅपचा डेटा खर्चाच्या बाबतीत तुलना करा. अनेक अॅप कमी डेटा खर्च करतात. तर अने ३MB प्रत्येक मिनीटाच्या हिशोबाने डेटा खर्च होतो. तेव्हा कोणतं अॅप वापरायचं हे ठरवा.

८. सध्या ऑनलाइन गेम्स खेळण्याचा ट्रेंडही खूप आहे. गेम खेळायचाच आहे तर तो ऑफलाइन इन्स्टॉल करा. ऑनलाइन गेम्स खेळतांना १ MB प्रति मिनीट डेटा खर्च होतो.

९. सध्या टिव्हीवर जाहिरात पाहून ऑनलाइन म्युझिक स्ट्रिमिंग अॅपचा आवडही युजर्समध्ये वाढलीय. अनेक जण आवडीनं Saavn, Hungama, Gaana.com सारखे अॅप ड़ाऊनलोड करून आवडती गाणी ऐकतात. मात्र जर आपण आवडते गाणे फोनमध्येच डाऊनलोड करून घेतले तर हा डेटा खर्च वाचेल.

१०. जर एखादं गाणं ३२० kbps बिट रेटनं स्ट्रीम होते असेल तर त्यामुळं प्रत्येक मिनिटाला आपला २.४ MB डेटा खर्च होईल. म्हणजे जर आपण १ तास ऑनलाइन गाणे ऐकले तर ११३ MB डेटा खर्च कराल.

११. म्युझिक स्ट्रिमिंग सारखंच यु-ट्यूब आणि इतर लाइव्ह स्ट्रिमिंग पासून वाचा. एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या व्हिडिओ स्ट्रिमिंगदरम्यान ५० MB प्रति मिनीटच्या दराने डेटा खर्च होतो. तर एक तास HD व्हिडिओ स्ट्रिमिंगमध्ये 3GB एवढा नेट डेटा खर्च होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.