५ गोष्टी घरात कधीच लावू नये

घरात आपण अनेक फ्रेम किंवा इतर फोटो लावतो. पण असे काही फोटो आहेत जे घरात लावणे अशुभ असू शकते. आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी सांगणार आहोत ज्या घरात लावू नये.

Updated: Jan 9, 2016, 10:28 PM IST
५ गोष्टी घरात कधीच लावू नये title=

मुंबई : घरात आपण अनेक फ्रेम किंवा इतर फोटो लावतो. पण असे काही फोटो आहेत जे घरात लावणे अशुभ असू शकते. आम्ही तुम्हाला असे काही गोष्टी सांगणार आहोत ज्या घरात लावू नये.

१. वाहत्या पाण्याचा फोटो

घरात वाहत्या पाण्याचे फोटो असणे म्हणजे धन टिकू शकत नाही अशी मान्यता आहे. त्यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते. त्यामुळे घरात असे झऱ्याचे फोटो लावू नका.

२. रडणाऱ्या बाळाचा फोटो :

अनेक लोकांच्या घरात रडणा-या बाळांचे फोटो भिंतीवर लावलेले असतात. अशा प्रकारचे फोटो लावणे अशुभ मानले जाते.

३. बुडणा-या जहाजाचा फोटो :

बुडणारी जहाजचा फोटो घरात ठेवला असेल तर त्यामुळे नकारातमकता तयार होते. याचा परिणाम नात्यांवर होतो अशी समझ आहे. 

४. हिंसक प्राण्याचे फोटो :

आज-काल बाजारात अनेक प्राण्यांचे पेटिंग मिळतात. पण ते घरात लावल्याने आपला स्वभाव हिंसक बनू शकतो. यामुळे कुटुंबातील लोकांचा स्वभाव रागीट होऊ शकतो.

५. युध्दाचा फोटो :

घरात युध्दाचे फोटो लावू नये. घरातील शांती भंग होण्यासाठी आणि घरामध्ये तणावाच्या कारणांना हे जबाबदार असू शकते.