5 गोष्टी सांगतील तुम्ही प्रेमात पडला आहात का ?

एखाद्या व्यक्तीबदल आपल्या मनात असणाऱ्या फिलिंग्स कशासाठी आहे. ते प्रेम आहे की आकर्षण याबाबत अनेक तरुण-तरुणी गोंधळात असतात. अनेकदा आपल्या मित्रासोबत वेळ घालवल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की केवळ ते त्याच्याबद्दल असणारे आकर्षण असतं हे आपल्याला समजत नाही.

Updated: Jan 10, 2016, 05:52 PM IST
5 गोष्टी सांगतील तुम्ही प्रेमात पडला आहात का ? title=

मुंबई : एखाद्या व्यक्तीबदल आपल्या मनात असणाऱ्या फिलिंग्स कशासाठी आहे. ते प्रेम आहे की आकर्षण याबाबत अनेक तरुण-तरुणी गोंधळात असतात. अनेकदा आपल्या मित्रासोबत वेळ घालवल्यानंतर आपण त्याच्या प्रेमात पडतो की केवळ ते त्याच्याबद्दल असणारे आकर्षण असतं हे आपल्याला समजत नाही.

प्रेमात पडलेल्या व्यक्तीची ही आहेत लक्षणे :

 १. त्या व्यक्तिचाच विचार करणे :

जर तुम्हाला त्याच व्यक्तीचा विचार सारखा मनात येत असेल आणि ती व्यक्ती काय करत असेल कुठे असेल आणि या विचारात आपण काय करत आहोत हे आपण विसरून जातो. खूप प्रयत्न करुनही तुम्ही त्याचे विचार करणे रोखू शकत नाही. तर तुम्ही प्रेमात पडला आहात.

२. इतरांपेक्षा अधिक महत्त्व देणे : 

जर तु्म्ही एका व्यक्तिला इतरांपेक्षा अधिक महत्त्व देत असाल आणि त्या व्यक्ती तुम्हाला इतरांपेक्षा अधिक वेगळी वाटत असेल. त्या व्यक्तीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असाल तर तुम्ही प्रेमात पडला आहात.

३. रोमँटीक गाणे ऐकणे : 

प्रत्येक गोष्ट जर तुम्हाला रोमँटीक वाटत असेल आणि तुम्हाला रोमँटीक गाणे ऐकण्याचा मूड होत असेल तर तुम्ही प्रेमात पडला आहात. रोमँटीक गाणे ऐकतांना तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येणे हे प्रेमाचंच लक्षण आहे. 

४. त्या व्यक्तीला भेटण्याची इच्छा होणे : 

एखाद्या व्यक्तीला जर सारखे भेटावेसे वाटत असेल आणि त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही अनेक कारणे शोधत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात.

५. स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करणे : 

अनेकांना स्वत:कडे बघण्यासाठी वेळेच नसतो. कदाचित ते त्याबाबतीत आळशी असतील पण जेव्हा एखाद्या व्यक्तीमुळे स्वत:च्या दिसण्याकडे, वागण्याकडे, बोलण्याकडे, स्मार्ट दिसण्याकडे अधिक लक्ष देत असाल तर तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात.