अॅमेझॉनचा गोंधळात गोंधळ, सेकंड हँड मोबाईलमध्ये पाठवल्या पॉर्न मुव्ही

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमध्ये अॅमेझॉन म्हणजे मोठं नाव. पण याच अॅमेझॉननं मोबाईलची डिल्हिवरी करताना घोडचूक केली आहे.

Updated: Feb 4, 2016, 04:20 PM IST
अॅमेझॉनचा गोंधळात गोंधळ, सेकंड हँड मोबाईलमध्ये पाठवल्या पॉर्न मुव्ही title=

उल्हासनगर: ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटमध्ये अॅमेझॉन म्हणजे मोठं नाव. पण याच अॅमेझॉननं मोबाईलची डिल्हिवरी करताना घोडचूक केली आहे. अॅमेझॉननं नवा मोबाईल पाठवण्याऐवजी उल्हासनगरमधल्या एका ग्राहकाला सेकंड हँड मोबाईल पाठवला. अॅमेझॉनचा गोंधळ एवढ्यावरच थांबला नाही, तर रिप्लेसमेंट म्हणून पाठवलेला फोन पॉर्न मुव्ही आणि पॉर्न फोटोग्राफ्सनं भरलेला होता.

उल्हासनगरच्या जरनाईल सिंग संधू यांनी अॅमेझॉनच्या वेबसाईटवर मायक्रोमॅक्सचा युरेका स्मार्ट फोन बूक केला. जेव्हा हा स्मार्ट फोन घरी आला तेव्हा त्यात फॉल्ट असल्याचं संधूंच्या लक्षात आलं. या फोनच्या स्क्रिनवर मोठ्या प्रमाणावर पांढरे ठिपके होते.

 

त्यानंतर त्यांनी  अॅमेझॉनच्या कस्टमर केअरला फोन करुन सांगितला. पण कोणताही तोडगा काढण्याऐवजी ही कोणतीही मोठी समस्या नाही, ती आपोआप थोडावेळानं दूर होईल असं उत्तर त्यांना देण्यात आलं.

फोनवरचे पांढरे ठिपके वाढतच चालल्याचं संधूंच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी पुन्हा कस्टमर केअरला फोन केला, त्यावेळी फोन कल्याणच्या सर्व्हिस सेंटरला पाठवा असं संधूंना सांगण्यात आलं, मग त्यांनी हा फोन सर्व्हिस सेंटर दिला, तेव्हा नवा फोन घरी येईल असं सांगण्यात आलं. 

काही दिवसांनी फोनची डिलिव्हरी तर त्यांच्या घरी आली, पण हा फोन बघितल्यावर संधूंना आणखी धक्का बसला. या फोनमध्ये पॉर्न मुव्ही आणि पॉर्न फोटो भरलेले होते. 
या नंतर पुन्हा एकदा संधूंनी कस्टमर केअरला फोन केला, तेव्हा पुन्हा एकदा हा फोन कल्याणच्या सर्व्हिस सेंटरला देण्याचं त्यांना सांगण्यात आलं.

सर्व्हिस सेंटरला गेले असता संधूंना फोनतर मिळालाच नाही, पण  उडवाउडवीची उत्तर देण्यात आली. त्यामुळे आता संधू कन्ज्युमर कोर्टात जायच्या तयारीत आहेत.