आता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स

आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.

Updated: Dec 9, 2014, 11:10 PM IST
आता कोणत्याही मोबाईलवरून लॅंडलाईनवर अनलिमेटेड फ्री कॉल्स title=

नवी दिल्ली : आज मोबाईल ही एक काळाची गरज झाली आहे. परंतु त्याचबरोबर या मोबाईलचे रिचार्ज, नेट पॅक हे सामान्य माणसाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. सगळ्या स्मार्टफोन्स यूजर्ससाठी खूप सारे अॅप्स आहेत ज्याने तुम्हाला फ्री व्हॉईस कॉलिंग करता येते. परंतु त्याला देखाल खूप साऱ्या अटी असतात त्या दोन्ही स्मार्टफोन यूजर्सकडे एकसारखच फ्री व्हाईस कॉल अॅप इन्स्टॉल असायला हवं.

जर तुम्ही कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा लॅंडलाईन नंबरवर कॉल करत असाल तर तुम्हाला त्यासाठी किंमत चुकवावी लागते. परंतु आता या त्रासातून स्मार्टफोन युजर्सना मुक्ती मिळणार आहे. सीनेटच्या ए्का रिपोर्टनुसार कॉल+ (call+) या अॅपद्वारे तुम्ही जवळजवळ ८५ देशांच्या मोबाईल आणि लॅंडलाईन  नंबर वर फ्री कॉल करू शकता.

सगळ्यात मुख्य बाब म्हणजे दुसऱ्या यूजर्सकडे हे अॅप इन्स्टॉल असणे आवश्यक नाही. कॉल + हे अॅप अॅंड्रॉइड आणि आईओएस यूजर्स साठी उपलब्ध आहे. कॉल केल्यानंतर हे अॅप तुमचा नंबर कॉलर आयडीमध्ये दाखवेल. या अॅपद्वारे तुम्ही कोणत्याही यूएसए नंबरवर तसेच मॅक्सिको चायनाच्या कोणत्याही लॅंडलाईन नंबरवर कॉल करू शकता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.