ठाणे : जिल्ह्यातील वाशिंदमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. मोबाईलचा स्फोट झाल्याने तरुण जखमी झाला. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. शहापूरमधील वासिंदमध्ये ही घटना घडली.
करण शंकर ठाकरे असे या तरुणाचे नाव आहे. मोबाईल फोनच्या स्फोटात त्याचा पाय पोळून निघालाय. हा फोन कार्बन कंपनीचा होता. करणने नेहमीप्रमाणे पँटच्या खिशात मोबाईल ठेवला होता. मात्र अचानक स्फोट झाल्याने फोन फुटल्याने डाव्या पायाची मांडी भाजली.
- फोन चार्जिंगला लावला असेल तर चार्जिंग सुरु असताना मोबाईल फोनवर बोलू नये.
- मोबाईल फोन 92 ते 97 टक्केच चार्ज करा. रात्रभर चार्जिंगला लावू नये.
- फोन चार्जिंग करताना तो लाकूड किंवा काचेच्या टेबलवर ठेवावा. पलंग किंवा उशीवर ठेवू नये. कारण बॅटरी गरम होते. त्यामुळे कापड जळ्याचा धोका अधिक असतो.