'ओराही'नं खरेदी केली १३ वर्षांच्या मुलानं बनवलेली वेबसाईट!

 कारपूलिंग प्लॅटफॉर्म 'ओराही'नं मंगळवारी 'इंडियन एन्जेल नेटवर्क'च्या 'ऑड-इव्हन डॉट कॉम'ला आपल्या ताब्यात घेतलंय. 

Updated: Apr 7, 2016, 01:05 PM IST
'ओराही'नं खरेदी केली १३ वर्षांच्या मुलानं बनवलेली वेबसाईट! title=

नवी दिल्ली :  कारपूलिंग प्लॅटफॉर्म 'ओराही'नं मंगळवारी 'इंडियन एन्जेल नेटवर्क'च्या 'ऑड-इव्हन डॉट कॉम'ला आपल्या ताब्यात घेतलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, odd-even.com ही वेबसाईट १३ वर्षांच्या अक्षत मित्तल या मुलानं सुरु केलं होती. 

काही दिवसांपासून 'ओराही' कंपनी अक्षतसोबत काम करण्यासाठी उत्सुक होती. आता अक्षत टेक्निकल आणि डोमेन बोर्ड म्हणून कंपनीशी निगडीत राहील. एमिटि इंटरनॅशनल शाळेत इयत्ता नववीमध्ये अक्षत शिकतो. 

काय आहे 'ऑड-इव्हन डॉट कॉम'

२०१५ मध्ये दिल्लीत ऑड-इव्हन लागू होण्यापूर्वीपासून odd-even.com आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लोकांना कारपूल सर्व्हिस प्रदान करत होती. 

या वेबसाईटवर गाड्यांचे मालक आणि प्रवास करण्याची इच्छा असणारे अनेक लोक आपली माहिती, कारची माहिती, प्रवासाचा मार्ग अशी माहिती एकमेकांशी शेअर करत एकमेकांना भेटत होते.