34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण!

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.

Updated: Nov 12, 2016, 06:36 PM IST
34 हजारांच्या 'आयफोन'ऐवजी हाती मिळाला 5 रुपयांचा साबण! title=

मोहाली : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट 'फ्लिपकार्ट'च्या धांदरटपणाचा फटका आणखी एका ग्राहकाला बसल्याचं समोर येतंय. 33,990 रुपयांच्या 'आयफोन 6'च्या ऐवजी फ्लिपकार्टनं या ग्राहकाच्या हातात चक्क 5 रुपयांचा साबण ठेवला.

एका मोठ्या कंपनीत फायनान्सर मॅनेजर पदावर काम करणाऱ्या सूर्यकांत त्यागी यांनी फ्लिपकार्टवरून मंगळवारी आयफोन 6ची ऑर्डर दिली होती. त्यांचं पार्सल आलं... पण, आतमध्ये मात्र आयफोनच्या ऐवजी एक साबण पाहिला आणि त्यागी यांना धक्काच बसला... 

आपल्या सहकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केल्यानंतर त्यागी यांनी फ्लिपकार्टवरिुद्ध पोलीस स्टेशनमध्ये रितसर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. शिवाय त्यांनी ही तक्रार ग्राहक पंचायतीकडेही दिलीय.