अंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी!

मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात.

Updated: Apr 6, 2016, 06:01 PM IST
अंधांसाठी 'फेसबूक'च्या झुकरबर्गची विशेष दृष्टी! title=

मुंबई : जगात अब्जावधी लोक फेसबूकचा वापर करतात. मित्र, काम, समाजसेवा, मज्जा अशा सर्वच गोष्टी फेसबूकवर मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जातात. मात्र, आपल्या जगात अशाही काही व्यक्ती आहेत ज्यांना त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे फेसबुकचा वापर करता येत नाही. त्यांनाही जगाशी कनेक्ट करता यावं यासाठी फेसबूकने पुढाकार घेतला आहे.

फेसबूकवर दिवसाला जगभरात लाखो फोटोज अपलोड केले जातात. मात्र, अंध व्यक्तींना या फोटोत काय आहे हे त्यांच्या शारीरिक मर्यादांमुळे शक्य होत नाही. याच समस्येचा सामना करण्यासाठी फेसबूकने एका 'टूल'ची निर्मिती केली आहे. या टूलच्या माध्यमातून एखाद्या फोटोत काय आहे याची माहिती हे टूल वाचून देणार आहे.

ज्यांना फोटो पाहता येत नाही त्यांना काही प्रमाणात का होई ना, पण त्या फोटोंचा अनुभव घेता येणार आहे. अंध लोकांसाठी उपलब्ध असलेल्या 'साउंड रीडर'वर आजवर अक्षरं वाचण्याची सोय होती. मात्र, एखाद्या फोटोत काय आहे, हे मात्र कळत नव्हते. ही सोयही फेसबूकने उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना फेसबूकच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट करण्याच्या दृष्टीने फेसबूकने टाकलेले हे कौतुकास्पद पाऊल म्हणायला हवं.