चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक घरात घातला

चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक चालवण्याची हौस पूर्ण केली आणि हा ट्रक घरात घातला, यापेक्षाही तळ्यात, खोल नाल्यातही उलट सूलट केला. या व्हॉल्व्हो ट्रकचं नियंत्रण चार वर्षाच्या मुलीकडे रिमोर्ट कंट्रोलद्वारे देण्यात आलं होतं.

Updated: Dec 7, 2015, 06:45 PM IST
चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक घरात घातला title=

मुंबई : चार वर्षाच्या मुलीने व्हॉल्व्हो ट्रक चालवण्याची हौस पूर्ण केली आणि हा ट्रक घरात घातला, यापेक्षाही तळ्यात, खोल नाल्यातही उलट सूलट केला. या व्हॉल्व्हो ट्रकचं नियंत्रण चार वर्षाच्या मुलीकडे रिमोर्ट कंट्रोलद्वारे देण्यात आलं होतं.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

फक्त चार वर्षाच्या मुलीकडे या ट्रकचं रिमोर्ट कंट्रोल देण्याचं कारणही तसंच होतं, आपल्या कंपनीचा ट्रॅक किती मजबूत आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. 

कोणत्याही खड्याखुड्यांच्या रस्त्यावर तो उलटला पडला, तरीही तो कसा सक्षम आहे हा दाखवण्याचा या प्रयत्न आहे. पुढील काळात ट्रॅकचं ड्रायव्हिंग रिमोर्ट कंट्रोलवर येईलही पण रस्त्यांवरील इतरांचं काय हा देखील मोठा प्रश्न आहे, तुर्तास हा थरारक व्हिडीओ पाहा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.