'फ्रीडम २५१' च्या नावाने केली जातेय फसवणूक

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची बुकिंग बंद झालीये. मात्र त्यानंतरही या स्मार्टफोनची क्रेझ कमी झालेली नाहीये. याचाच फायदा घेत आता फ्रीडम २५१च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आलीये. 

Updated: Feb 23, 2016, 11:15 AM IST
'फ्रीडम २५१' च्या नावाने केली जातेय फसवणूक title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असलेल्या फ्रीडम २५१ या स्मार्टफोनची बुकिंग बंद झालीये. मात्र त्यानंतरही या स्मार्टफोनची क्रेझ कमी झालेली नाहीये. याचाच फायदा घेत आता फ्रीडम २५१च्या नावाने लोकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आलीये. 

नोएडामध्ये या फोनसाठी ऑफलाइन बुकिंग केली जात आहे. त्यासाठी ग्राहकांना २५१ रुपयांची पावतीही दिली जातेय. मात्र कंपनीने अशा फसवणुकीपासून दूर राहण्याचे आवाहन केलेय. अधिकृतरित्या कोणताही व्यवहार ऑफलाईन केला जात नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट कऱण्यात आलेय. 

या स्मार्टफोनची ऑनलाईन बुकिंग सुरु झाल्यानंतर तब्बल ७ कोटी लोकांनी या स्मार्टफोनसाठी बुकिंग केले होते. मात्र केवळ २५ लाख लोकांना हा स्मार्टफोन दिला जाणार आहे.