भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री

भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

Updated: May 18, 2017, 05:23 PM IST
भारतात बंद होणार शेवरले गाड्यांची विक्री title=

मुंबई : भारतीय बाजारपेठेतील दिवसेंदिवस घटत जाणारी लक्षात घेता जनरल मोटर्सनं भारतातून आपला विक्रीचा गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतलाय. जनरलम मोटर्स भारतात यापुढे आपल्या वाहनांची विक्री करणार नाही. जीएम भारतात शेवरले ब्रँडच्या गाड्यांची विक्री करते. 

जवळपास दोन दशकांपासून ही कंपनी भारतात बस्तान बसवून आहे. परंतु, त्यांच्या पदरी निराशाच पडली. कंपनीनं गुजरातमधील आपल्या कारखान्यातून उत्पादन गेल्या वर्षी थांबवलं होतं. सध्या महाराष्ट्रातील तळेगाव स्थित आपल्या कारखान्यातून निर्माण होणाऱ्या गाड्या निर्यात करण्यावर कंपनीनं आपलं लक्ष केंद्रीत केलंय. 

'मेड इन इंडिया'चा तर हा झटका नाही ना, असंही कंपनीच्या या निर्णयावर म्हटलं जातंय. कंपनीनं रशिया आणि युरोपसहीत चार अन्य आंतरराष्ट्रीय बाजारांतूनही काढता पाय घेण्याचा निर्णय घेतलाय. 

२०१६-१७ साली जनरल मोटर्सची भारतातील विक्री जवळपास २१ टक्क्यांनी कमी होत केवळ २५,८२३ गाड्यांवर येऊन पोहचली होती. तर या दरम्यान कंपनीचं उत्पादन मात्र १६ टक्क्यांनी वाढून ते ८३,३६८ वाहनविक्री पर्यंत पोहचलं होतं. यातील अनेक गाड्यांची निर्यात केली गेली. 

कंपनीनं आपला हा निर्णय आपल्या कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहचवलाय. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भरच पडलीय. जवळपास २०० कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार असल्याचं सांगण्यात येतंय.