कसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर

प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.

Updated: Aug 25, 2016, 12:14 PM IST
कसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर title=

मुंबई : प्रत्येक मुलीला आपलं स्वतंत्र गमवायचं नसतं. लग्न करुन मी कोणाच्या बंधनात राहणार नाही अशी वाक्य आपण नेहमी सिंगल मुलींकडून ऐकत असतो. करियर करायचे आणि कोणावरही निर्भर न राहता जगण्याचा मुलींचा कल असतो. पती कसा असावा यासाठी मुलींचे अनेक स्वप्न असतात.
 
होणारा पती हा खूप प्रेम करणारा असावा, त्याच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करावी त्याने माझ्या समस्या समजून घ्याव्यात. वैवाहिक जीवन आंनदात जावे यासाठी मुली योग्य मुलाची निवड करतात.

कसा असतो मुलींच्या मनातला लाईफ पार्टनर

1. माझ्या प्रत्येक गरजेच्यावेळी तो माझ्याबरोबर असावा.

2. त्याच्या स्मितहास्याने माझ्या दिवसाची सुरूवात व्हावी.

3. प्रत्येक आंनदाचा क्षण मी त्याच्यासोबत माझ्याबरोबर घालवावा.

4. त्याने मला नेहमी सरप्राईज द्यावेत.

5. मला अगदी लहान मुलांसारखं कोणतीही गोष्ट समजवून सांगावी.