मुंबई : तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी तुम्ही काही तासांपूर्वीच चार्ज केलेली असते, आणि काही वेळाने ही बॅटरी पुन्हा कमी झाल्याचं दिसल्यावर तुम्हाला धक्का बसतो, पण असं काय होतं, की तुमच्या फोनची बॅटरी लवकरच डीस्चार्ज होते, आणि फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी नेमकं काय करणे योग्य असेल.
मात्र फोनच्या बॅटरीला योग्य पद्धीतीने चार्ज केलं तर बॅटरी जास्त वेळे टिकण्यास मदत होते.
मोबाईल फोन निर्मात्या कंपन्यांचं म्हणणं आहे की, फोनची बॅटरी फक्त ३०० ते ५०० वेळेस चार्ज होण्यासाठी बनवण्यात आली आहे, यानंतर बॅटरीची क्षमता कमी होण्यास सुरूवात होते. यानंतर बॅटरी कितीही चार्ज केली तरी अॅव्हरेज मात्र झपाट्याने कमी होतो.
जाणकारांच्या मते बॅटरी ० ते १०० टक्क्यांपर्यंत रिचार्ज करू नये, लिथियम आयन बॅटरी ४० ते ८० टक्के रिचार्ज करायला हवी, तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे तुमची बॅटरी कधीच २० टक्क्यांच्या खाली यायला नको.
पीसी अॅडव्हायजरच्या माहितीनुसार, बॅटरीला महिन्यातून फक्त एक वेळा १०० टक्के चार्ज करायला हवं. ज्या प्रमाणे कम्प्युटरला रिस्टार्ट केलं जातं त्याप्रमाणे.
आपल्या फोनसोबत जे चार्जर आलं, त्याचा वापर करूनच फोन चार्ज करणं कधीही उत्तम असतं, बाजारात मिळणारे चार्जर, फक्त काही फोनसाठीच तयार केलेले असतात, त्याने आपला फोन चार्ज केल्यास बॅटरीवर कालांतराने वाईट परिणाम होत असतो.
लिथियम-आयन बॅटरीला बरेच दिवस चार्ज न करता ठेऊ नका. दुसरं महत्वाचं म्हणजे ४० ते ५० टक्के बॅटरी चार्ज ठेवणं कधीही चांगलं, अशी बॅटरी महिन्यातून ५ ते १० वेळेस डिस्चार्ज होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.