HTC चा १३ मेगापिक्सेल ‘सेल्फी’ स्मार्टफोन लॉन्च

तायवानच्या एचटीसी कंपनीनं बुधावारी त्यांचा हाय रिझॉल्यूशन कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनच्या दोन्ही कॅमेऱ्यांनी आपण सेल्फी काढू शकाल. 

AFP | Updated: Oct 9, 2014, 08:44 AM IST
HTC चा १३ मेगापिक्सेल ‘सेल्फी’ स्मार्टफोन लॉन्च title=

न्यू यॉर्क: तायवानच्या एचटीसी कंपनीनं बुधावारी त्यांचा हाय रिझॉल्यूशन कॅमेरा असलेला नवा स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनच्या दोन्ही कॅमेऱ्यांनी आपण सेल्फी काढू शकाल. 

‘HTC डिझायर आय’ या स्मार्टफोनमध्ये दोन्ही फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे १३ मेगापिक्सेलचे आहेत. डिझायर आय फोटो, व्हिडिओ आणि सेल्फी प्रेमींसाठी खास बनवण्यात आलाय. 

हा नवा फोन यूएसमध्ये AT&T द्वारे विकला जाणार आहे. एचटीसीनं वेगळ्या आकाराच कॅमेराही लॉन्च केलाय. हा कॅमेरा एखाद्याच्या हातात सहज मावेल असा आहे. HTC भविष्यात यू-ट्यूबच्या मदतीनं लाईव्ह स्ट्रिमिंग कॅमेराही लॉन्च करण्याच्या विचारात आहे. 

जुलै-सप्टेंबर महिन्यात HTCनं २१ मिलियन डॉलर इतका नफा कमावलाय.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.