ईशारा... 2014 मध्ये होणार ‘ऑनलाईन मर्डर’!

काय??? मर्डर... आणि तोही ऑनलाईन??? कसं शक्य आहे हे??? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात एव्हाना भुंगा घालायला लागले असतील... 

Updated: Oct 8, 2014, 07:46 PM IST
ईशारा... 2014 मध्ये होणार ‘ऑनलाईन मर्डर’! title=

नवी दिल्ली : काय??? मर्डर... आणि तोही ऑनलाईन??? कसं शक्य आहे हे??? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात एव्हाना भुंगा घालायला लागले असतील... 

परंतु, जगातील पहिला ऑनलाईन खून याच वर्षाच्या शेवटापर्यंत होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हा इशारा इंटरनेट एक्सपर्टस् आणि एजन्सीजनं दिलाय. 
यामध्ये, इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या डिव्हाइसला हॅक करून ऑनलाईन मर्डर केला जाण्याची शक्यता आहे. हा इशारा यूरोपीय युनियनच्या पोलीस युरोपोलद्वारे दिला गेलाय. सायबर जगतातील गुन्हेगावर इंटरनेटचा वापर करून एखाद्या व्यक्तीला निशाणा बनवू शकतील, अशी चिंता यात व्यक्त करण्यात आलीय.

काय आहे ‘ऑनलाईन मर्डर’चा अर्थ... 
ऑनलाईन मर्डर हा इंटरनेटच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला संपविण्याची नवीन आणि आधुनिक पद्धत आहे. ज्याच्या माध्यमातून सातसमुद्रापार बसलेल्या व्यक्तीला एखादी व्यक्ती संपवू शकते. याचमुळे जगभरातील इंटरनेट एक्सपर्ट चिंताग्रस्त आहेत. 

यासाठी, स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटर, स्मार्टवॉच, स्मार्टफोन, होम अप्लाएन्स, स्मार्टटीव्ही, हार्ट पेसमेकर यांसारख्या आधुनिक उपकरणांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. 

एका इंग्रजी दैनिकात दिलेल्या बातमीनुसार, युरोपोलनं गेल्याच आठवड्यात याबद्दल माहिती प्रकाशित केली. यामध्ये अमेरिकन सुरक्षा फर्म आयआयडीच्या रिपोर्टचा हवाला दिला गेलाय. यात, इंटरनेटशी निगडीत डिव्हाईस हॅक करू एखादा मर्डर याच वर्षीच्या शेवटापर्यंत उजेडात येण्याची शक्यता आहे. इंटरनेटच्या वापरामुळे गुन्हेगारांना आपल्या मनसुब्यांना सहजतेनं आकार देणंही शक्य होण्याचे अनेक मार्ग मिळालेत. यावर नियंत्रण मिळवणं सध्या तरी कठिणच असल्याचं दिसतंय. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या काही दशकांत करोडो डिव्हाईस इंटरनेटशी जेडले गेलेले असतील पण त्यांच्या सुरक्षेतही तेव्हढीच वाढ करणं गरजेचं असेल. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.