LEAKED: HTC चा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन M9 चा फोटो लीक

गॅझेल लीकर @evleaks नं एचटीसीच्या दोन हाय बजेट आणि मोस्ट अवेटेड अशा स्मार्टफोन्सचे फोटो लीक केले आहेत. यातील एक कंपनीची बेस्ट सीरिज एचटीसी वन M9 असू शकतो. 

Updated: Jan 31, 2015, 07:52 PM IST
LEAKED: HTC चा  मोस्ट अवेटेड स्मार्टफोन  M9 चा फोटो लीक title=

नवी दिल्ली: गॅझेल लीकर @evleaks नं एचटीसीच्या दोन हाय बजेट आणि मोस्ट अवेटेड अशा स्मार्टफोन्सचे फोटो लीक केले आहेत. यातील एक कंपनीची बेस्ट सीरिज एचटीसी वन M9 असू शकतो. 

@evleaks च्या आजच्या एका ट्विटमध्ये एचटीसी स्मार्टफोन M8आणि M9 सोबत फ्लॅगशिपचा फोटो शेअर केलाय. ज्यात हे स्पष्टपणे दिसतंय की हा कंपनीचा नवा हाय बजेट स्मार्टफोन M9 असू शकतो.

जर हे लीक झालेले फोटो खरे असतील तर कंपनी आपले दोन नवे स्मार्टफोन हिमा आणि हिमा अल्ट्रा लॉन्च करू शकते. फोटोंमध्ये हे फोन एचटीसीचे रेग्युलर स्मार्टफोन्सपेक्षा मोठे दिसत आहेत. त्यामुळं अपेक्षा आहे की, हे दोन फॅबलेट असतील. 

एका फोटोवरून फोनबद्दस खूप काही सांगणं कठीण आहे पण फोनची बॅक बॉडी पूर्णपणे मेटॅलिक दिसतेय. नेक्सस ९ सारखं या फोनमध्ये फ्रंट फेसिंग स्पीकर्स असू शकतात. बाकी जुन्या एचटीसी मॉडेल पासून वेगळा नवा फ्लॅगशिपची फ्रंट बाजू पूर्णपणे ग्लास कव्हर्ड असेल.

या फोनबद्दल जी चर्चा आहे त्यानुसार फोनच्या डिस्प्ले फ्रंटवर कोणत्याही प्रकारची बटन नसेल. फ्रंट डिस्प्लेवर टच सेंसर असेल. आशा आहे की एचटीसी आपल्या नव्या फोनमध्ये फिंगर प्रिंट स्कॅनर पण लॉन्च करू शकते. यापूर्वी कंपनीनं आपला स्मार्टफोन वन मॅक्ससाठी बायोमॅट्रिक सेंसर हा प्रयोग केला होता. पण तो अपयशी ठरला आणि कंपनीला रियर माउंट स्कॅनरनंच काम करावं लागलं.

आता जेव्हा फिंगर प्रिंट स्कॅनर एचटीसीची रायवल कंपनी अॅपल, सॅमसंगनं लॉन्च केलाय. तर आता एचटीसीसुद्धा आपल्या स्मार्टफोनमध्ये अशाप्रकारचे सेंसर अॅड करेलच.

बार्सिलोनामध्ये १ मार्चला होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसपूर्वी कोणत्याही प्रकारच्या निर्णयाबाबत पोहोचता येऊ शकतं. पण एचटीसीच्या फ्लॅगशिपवर सर्वांची नजर असेल.

Source: अँड्रॉइड सेंट्रल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.